एडिलेड : वृत्तसंस्था – टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) मध्ये भारताचा उद्या बांग्लादेशबरोबर (Bangladesh) सामना (IND vs BAN) होणार आहे. एडिलेडमध्ये (Adelaide) दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बांग्लादेशला मागच्या 4 वर्षापासून सतावत आहे हि समस्या
बांग्लादेशच्या टीमने मागच्या चार वर्षांपासून पेस आणि बाऊन्सच्या समस्येचा मोठ्या प्रमाणात सामना केला आहे.
बांग्लादेशचा 2018 पासूनच वेगवान गोलंदाजांविरुद्ध रेकॉर्ड खराब आहे. वेगवान गोलंदाजांविरोधात मागच्या चार वर्षांपासून बांग्लादेशी फलंदाजांचा स्ट्राइक रेट खराब आहे. त्यांच्या फलंदाजांना पेस आणि बाऊन्स सहजरित्या खेळता येत नाही.
बांग्लादेशी फलंदाजांना पेसची भिती
बांग्लादेशी फलंदाजांचा पेस आणि बाऊन्स विरोधात स्ट्राइक रेट (Strike Rate) फक्त 110 आहे. कुठल्याही टीमच्या फलंदाजांचा हा सर्वात कमी स्ट्राइक रेट आहे. त्यामुळे टीम इंडिया बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात (IND vs BAN) त्यांच्या या कमजोरीचा फायदा उचलणार हे मात्र नक्की.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गोलंदाजीत टीम इंडियाच कॉम्बिनेशन काय असेल?
ऑस्ट्रेलियात (Australia) विकेट्सवर पेस आणि बाऊन्स दोन्ही मिळतो.
हीच बांग्लादेशची सर्वात मोठी कमजोरी आहे. त्यामुळे टीम इंडिया या कमजोरीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल.
त्यामुळे टीम इंडिया आपल्या प्लेइंग 11 मध्ये अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवेल का?
याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
Web Title :- IND vs BAN | bangladesh batters struggling against pace bounce last 4 years ind vs ban match t20 world cup 2022 sport news
हे देखील वाचा :
Bank Loan | ग्राहकांना महा फटका! या तीन बँकांचं कर्ज महागलं, EMI आणि व्याजदरही वाढला