नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाची वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता पुन्हा एकदा इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉलच्या जागरूकतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. आयसीएआरकडून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांमध्ये लेदरची पर्स, बेल्ट, बॅग, शूज इत्यादीचा वापर आणि असुरक्षित दुकानातून खरेदी केलेले मांस सेवन करण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉक्टरांनी बचावाप्रती लोकांच्या निष्काळजीपणाने संसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शंका व्यक्त केली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये सर्वात महत्वाचे, बचावासाठी सतर्क राहणे आहे. नुकतेच एका संशोधनात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस अनेक वस्तूंवर मोठ्या कालावधीपर्यंत जिवंत राहतो. चामड्याच्या वस्तूंवर व्हायरसची सक्रियता सुमारे पाच ते नऊ दिवसांपर्यंत राहते, प्लास्टिक, लोखंड, लाकूड आणि काच इत्यादी वस्तूंवर वेगवेगळ्या कालावधीपर्यंत सक्रियता सांगण्यात आली आहे. याचा आयसीएमआरने इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्राटोकॉलमध्ये समावेश केला आहे.
मायक्रोबॉयोलॉजिस्ट डॉ. राहुल यांनी सांगितले की, मोठ्या कालावधीपर्यंत एखाद्या वस्तूंवर व्हायरसची सक्रियता संक्रमित होण्याची शक्यता वाढवते. लेदर जैविक असते. यावर व्हायरसची मोठ्या कालावधीपर्यंत सक्रियता कायम राहात असल्याने याच्या संपर्कात आल्यास ते व्यक्तीला संक्रमित करू शकते.
कोरोना व्हायरस प्लास्टिकवर दोन ते तीन दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो. अशावेळी चामड्याच्याच नव्हे तर प्लॅस्टिक शूज, चप्पल घालण्याने सुद्धा धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच, हा व्हायरस रबर, चामडे आणि पीव्हीसी आधारित वस्तुंवर पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो, यासाठी शूज-चप्पल चांगल्या धुवून घाला. हात सॅनिटाइज करा किंवा धुवा.
तांब्यावर 4 तास, रबरवर 8 तास, पॉलिथीनवर 24 तास, अॅल्युमिनियमवर 6 तास, प्लास्टिकवर 3 तास, स्टीलवर 3 तास, लाकडावर 4 तास, लेदरवर 5 ते 9 दिवस कोरोना व्हायरस जिंवत राहतो.