मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Income Tax Slab | करदात्यांना आयकर विभागाकडून (Income Tax Department) एक दिलासा देण्यात आला आहे. 2021-2022 वर्षासाठी आयकर परतावा (Returns) अथवा आयटीआर (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 रोजी होती. परंतु, आता मुदत वाढवण्यात आली आहे. रिटर्न (ITR) भरण्याची सुविधा आता 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. महत्वाचे म्हणजे हे देय मुदतीच्या तारखेपर्यंत जमा केले नाही तर सरकार तुमच्यावर कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Income Tax Slab)
ज्या करदात्यांनी 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरला नाही. त्यांच्या कर स्लॅबनुसार (Income Tax Slab) दंड भरून ITR पूर्ण करू शकणार आहेत. आयटीआर 31 मार्चपर्यंत भरला नाही तर कर भरावा लागल्यानंतर किमान तीन वर्षे आणि अधिकाधिक सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशा करदात्यांकडून आयकर विभाग थकित कर आणि व्याजाशिवाय 50 ते 200 टक्के दंडही लावू शकतो. सरकारची इच्छा असेल तर ते करदात्यावर खटला देखील चालवू शकतात.
दरम्यान, प्राप्तिकर नियमांनुसार, ITR दाखल करण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रत्येक करदात्यावर सरकार कारवाई करत नाही. जेव्हा कर दायित्व 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तेव्हाच आयकर विभाग खटल्यांची कार्यवाही सुरू करतो. जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर करदात्याला 5 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकणार आहे. परंतु, जर करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडाची रक्कम 1 हजार रुपये असणार आहे.
Web Title :- Income Tax Slab | income tax department may start legal proceeding if not file your return till 31 march
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
LIC IPO | एलआयसीच्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती मिळणार लाभ? सगळ्यात आधी करा ‘हे’ काम पूर्ण
Aloe Vera For Weight Loss | ‘या’ 5 पद्धतीने केले एलोवेराचे सेवन तर ताबडतोब कमी होईल वजन
Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांनी खाऊ नये मध? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…