नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दर महिन्याच्या खर्चासोबत कर वाचवण्यासाठी सेविंग करून वेगळे पैसे वाचवावे लागत असल्याने नव्या वर्षातले तीन महिने नोकरदारांसाठी ताणाचे असतात. तेव्हा शेवटच्या क्षणी घाई करण्यापेक्षा वर्षभराचेच प्लॅनिंग करणे जास्त चांगले असते.
पुढील गोष्टी तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
१. सेक्शन 80 TTA नुसार सेव्हिंग खात्यांवर मिळणाऱ्या व्याजावर सूट मिळते. बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा टाइम डिपॉझिटमधून मिळणाऱ्या व्याजावर या सेक्शननुसार सूट मिळणार नाही.
२. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहात असाल तर तुम्हाला करात सवलत मिळू शकते. सेक्शन 80 GG नुसार जास्तीत जास्त सवलत 60 हजार रुपयांवर आहे.
३. सरकारी योजनांमधील पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) हा एक चांगला पर्याय असून त्याचा मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षांचा आहे. तसेच या अकाउंटवर मिळणारे व्याजही टॅक्स फ्री असते.
४. इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 D नुसार मेडिकल इन्शुरन्ससाठी दिल्या जाणाऱ्या प्रिमियमवरचा टॅक्स वाचवू शकतो.
५. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) याची NPS टायर- १ अकाउंट प्रायमरी अकाउंट आणि NPS टायर – २ अकाउंट अशी दोन प्रकारची खाती असतात. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवरही कराची सवलत असते.
६. लाईफ इन्शुरन्सबी प्रीमियम, बँक एफडी, ट्युशन फी, सुकन्या समृद्धी योजना,नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, पेन्शन्स फंडस् या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर कर बसत नाही तर यासाठी दीड लाख रुपयांची मर्यादा आहे.
७. सेक्शन 80 G नुसार 2 हजार रुपयांपेक्षा जादा देणगी दिली तर कर सवलत मिळू शकते. ही देणगी कॅश, डिमांड ड्राफ्ट, बँक ट्रान्सफर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या स्वरूपात हवी.
Visit : bahujannama.com