नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉर्पोरेट कर कमी केल्यानंतर आता सरकार इनकम टॅक्स कमी करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयात बैठका सुरू आहेत. महसूल विभागांतर्गत सीबीडीट विभाग, जो आयकर संबंधित धोरणांचा निर्णय घेत असतो. त्यांची बैठक घेतली जात आहे. या बैठकीचा आधार टास्क फोर्सची शिफारस करण्यासाठी बनवला आहे.
टास्क फोर्सने मागील महिन्यात थेट करात बदल करण्याबाबत शिफारस केली होती आणि त्या शिफारसीच्या आधारे, आयकरात कोणत्या मार्गाने बदल केला पाहिजे या बदलाचा आढावा घेण्यात येत आहे. लघु आणि मध्यम करदात्यांना दिलासा देणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. दिलासा मिळाल्याने अर्थातच दुप्पट रक्कम वाढेल आणि रक्कम वाढल्यानंतर डिमांड देखील वाढेल, हे एक विशेष उद्दीष्ट आहे.
यामध्ये, टास्क फोर्स ज्याची शिफारस केली आहे. त्याच्या शिफारशींतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लावू नये. सध्या २.५० लाख ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जातो. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त, १० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर आणि दहा लाख ते 20 लाख रुपये २ टक्के कर तर २० लाख ते २ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर घेण्यात यावा.
टास्क फोर्सच्या शिफारशीत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली आहे ती म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न २ कोटींपेक्षा जास्त असेल तर ३५ टक्के कर भरावा. म्हणजे त्यात एक स्लॅब अतिरिक्त जोडला गेला आहे. त्याच वेळी अधिभार काढून टाकण्याची शिफारस केली गेली आहे. या शिफारशींच्या आसपास याचा आढावा घेतला जात आहे आणि हे देखील पाहिले जात आहे की राज्य तिजोरीची स्थिती कशी आहे, ज्याच्या आधारावर हा निर्णय घ्यावा लागेल.
Visit : bahujannama.com