नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income tax department) ने चालू आर्थिक वर्षासाठी 1 एप्रिलपासून 2 ऑगस्टपर्यंत 21.32 लाख टॅक्सपेयर्स (taxpayers) चा सुमारे 45,896 कोटी रुपयांचा रिफंड (income tax refund) जारी केला आहे. इन्कम टॅक्स विभागाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IT डिपार्टमेंटने 21.32 इंडिव्हिज्युअल प्रकरणात 13,694 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. तर, 1,19,173 कॉर्पोरेट प्रकरणात 32,203 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
स्टेटस चेक करू शकता
CBDT ने आयकर कायदा, 1961 अंतर्गत विविध फॉर्म्सच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंगसाठी अंतिम तारीख वाढवली आहे. ही रक्कम टॅक्सपेयर्सच्या खात्यात पाठवली गेली आहे. हे पैसे खात्यात आले किंवा नाही यासाठी स्टेटस चेक करू शकता.
इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची पद्धत
1. वेबसाइटवर असे करा चेक
– www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर ऑनलाइन करा.
– Status of Tax Refunds टॅबवर क्लिक करा.
– आपला पॅन नंबर आणि असेसमेंट ईयर टाका, ज्यावर्षासाठी रिफंड पेंडिंग आहे.
– जर डिपार्टमेंटने रिफंड प्रोसेस केली तर एक मेसेज येईल. मोड ऑफ पेमेंट, रेफ्रन्स नंबर, स्टेटस आणि रिफंडच्या तारखेचा उल्लेख असेल.
– जर रिफंड प्रोसेस झाली किंवा दिलेला नाही तर तसा मेसेज येईल.
2. ई-फायलिंग पोर्टलवर असे करा चेक –
– येथे क्लिक करून प्राप्तीकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये एंटर करा.
– रिटर्न / फॉर्म पहा.
– माय अकाऊंट टॅबवर जा आणि इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा.
– सबमिटवर क्लिक करा.
– पावती (acknowledgement) नंबरवर क्लिक करा.
– इनकम टॅक्स रिफंडच्या स्थितीसह रिटर्न डिटेल दाखवणारे पेज दिसेल.
काय आहे टॅक्स रिफंड?
प्राप्तीकर दात्याचा इन्कम टॅक्स एखाद्या आर्थिक वर्षात त्याच्या अंदाजित गुंतवणूक कागदपत्रांच्या आधारावर अॅडव्हान्स कापला जातो. परंतु जेव्हा आर्थिक वर्षच्या अखेरीपर्यंत ते फायनल कागदपत्र जमा करतात, तेव्हा जर हिशोब केल्यानंतर त्यास हे समजते की त्याचा टॅक्स जास्त कापला गेला आहे आणि प्राप्तीकर विभागाकडून पैसे परत घ्यायचे आहेत, यासाठी तो आयटीआर दाखल करून रिफंडसाठी अप्लाय करूशकतो.
Web Title :- income tax department issue 45896 cr rupees refund from april to july 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video