नवी दिल्ली :वृत्तसंस्था- आधार नंबरला पॅन कार्ड नंबरशी (Link Pan Card to Aadhar) लिंक करण्यासाठी आयकर विभाग (Income Tax Department) कठोर भूमिका घेऊ शकते. सुमारे 13 वेळा विभागाने डेडलाईन वाढवलेली असल्याने आता ज्यांनी आपला पॅन नंबर अद्याप आधारशी लिंक केलेला नाही अशा कर्मचार्यांचे पगार रोखण्यासाठी कंपन्यांना (Employer) निर्देश दिले जाऊ शकतात. वरीष्ठ सूत्रांनुसार, विभागाने कंपन्यांना सर्क्युलर (circular) जारी करून आपल्या कर्मचार्यांचे आधार आणि पॅन लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत.
लिंकिंगसाठी आता 30 जून अखेरची तारीख आहे. लिंक न केलेले पॅन कार्ड वापरल्यास इन्कम टॅक्स अॅक्ट अंतर्गत सेक्शन 272बीचे उल्लंघन मानले जाईल. अशा पॅन कार्डधारकाला 10000 रुपये दंड भरावा लागेल. पुन्हा अशी चूक झाल्यास दंड वाढू शकतो.
ऑनलाइन असे करा लिंक
1. अकाऊंट नसेल तर स्वताला रजिस्टर करा.
2. प्राप्तीकर विभागाची ई-फायलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.
3. वेबसाइटवरील लिंक आधार ऑपशनवर क्लिक करा.
4. लॉगइननंतर अकाऊंटच्या प्रोफाईल सेटिंगमध्ये जा.
5. प्रोफाइल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक ऑपशन सिलेक्ट करा.
6. येथील सेक्शनमध्ये आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
7. यानंतर खालील लिंक आधार ऑपशनवर क्लिक करा. यानंतर आधार लिंक होईल.
web title: Income Tax Department | Income tax alert! Do ‘this’ work immediately, otherwise your ‘salary’ may be delayed