बहुजननामा ऑनलाइन – राज्यात लाच खोरीत पुणे विभाग अव्वल स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर अमरावती विभागाने सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. आठ महिन्यांची आकडेवारी पाहता कोरोनाच्या काळात देखील एसीबीची दणकेबाज कारवाई सुरू आहे. मात्र यातून लाच खोरी देखील तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात 8 महिन्यात 419 सापळा कारवाई करून पकडले आहे.
राज्यात कोरोनाच्या काळात काही महिने सर्वच शासकीय कार्यालये व ऑफिस बंद होते. केवळ आरोग्य विभाग, पालिका आणि पोलीस विभाग काम करत होता. मात्र तरीही लाचेचा आलेख हलता असल्याचे दिसून येत आहे. एसीबीची कारवाई पाहता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राज्यात यंदा 2020 मध्ये 1 जानेवारी ते 10 सप्टेंबर या कालावधीत राज्यात एसीबीने केलेल्या कारवाईत पुणे विभाग अवल ठरले आहे. तर दुसरा क्रमांक अमरावती विभाग आहे. त्यानंतर नाशिक आहे. सर्वात कमी कारवाया या मुंबई विभागात झाल्या आहेत. 8 महिन्यात केवळ 8 कारवाया झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाच खोरी कमी झाली की लाच लुचपत विभागाची कारवाई कमी झाले हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, राज्यातील लाचखोरी रोखण्यासाठी आणखी कडक पावले उचलावी लागणार आहेत. तर दुसरीकडे लाचखोरीचे प्रकरण एसीबी समोर आणत असले तरी न्यायालयात शिक्षा हिण्याचे प्रमाण मात्र कमीच असल्याचे आजपर्यंतची आकडेवारी पाहता दिसत आहे.
राज्यातील 8 रेंजमधील आकडेवारी
पुणे विभाग– 101
अमरावती विभाग–61
नाशिक विभाग–60
नागपूर विभाग–57
औरंगाबाद विभाग–52
नांदेड विभाग–49
ठाणे विभाग–29
मुंबई विभाग–10
*पुणे विभाग*
पुणे- 30
सातारा- 18
सांगली- 18
कोल्हापूर-19
सोलापूर- 16
क्लास वन- 15
क्लास टू- 7
क्लास थ्री- 4
क्लास- 22
इतर– 43
पुणे विभागात सर्वाधिक कारवाया या महसूल खात्यात झाल्या आहेत. 8 महिन्यात महसूलमधील 26 कारवाया केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांचा समावेश आहे. पोलीस खात्यातील 22 कारवाया झाल्या आहेत.
*अमरावती विभाग*
अमरावती विभागात गेल्या आठ महिन्यात एसीबीने 62 सापळा कारवाईत 86 जणांना पकडले आहे. त्यात क्लास वनचे अधिकारी 8, क्लास टू 6 आणि क्लास थ्री 51 जण आहेत. त्यासोबतच क्लास फोरचा 1 कर्मचारी असून, पब्लिक सर्वन्ट 4 असून, 14 खासगी व्यक्तींना पकडले गेले आहे.
सर्वाधिक प्रकरण पोलीस विभागाचे
अमरावती जिल्ह्यात एसीबीने केलेल्या कारवाईत पोलीस विभाग लाच घेणार ठरला आहे. पोलीस विभाग 18 तर महसूल विभाग 14 तसेच पंचायत समिती 7 आणि फॉरेस्ट विभाग 4 असा आलेख आहे.
अमरावती शहर- 17
अकोला–12
यवतमाळ–11
बुलढाणा–11
वाशीम–10