भोकर बहुजननामा ऑनलाईन – दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यात भोकर न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून खून करणाऱ्या एकाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा भोकर न्यायालयाने सुनावली आहे.
दिगंबर बाबुराव दासरे याला फाशी तर मोहन नागोराव दासरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिगंबर दासरे याची बहिण बहिण २२ वर्षीय पुजा हिचे लग्न ज्योतिबा हर्सेन्न वर्षेवार याच्यासोबत लग्न झाले होते. परंतु लग्नापुर्वी ३ वर्षांपासूनच पुजा हिचे गावातीलच गोविंद कराळे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर ती कुणालाही काही न सांगता प्रियकर कराळेसोबत सासरहून पळून गेली होती. तिच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसात केली होती. या प्रेमसंबंधांची माहिती दिगंबरला होती. त्याने फोन करून गोविंदशी संपर्क साधला. त्यानंतर ते दोघे कुठे आहेत याची माहिती घेतली तेव्हा दोघेही तेलंगणा राज्यात निर्मल जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात असलेल्या मौजे खरबळा येथे पळून गेले होते.
असा झाला खून
दोघे पळून गेल्यानंतर दिगंबर त्यांच्याकडे गेला. हे प्रकरण मिटवून घ्या असे सांगितले. मात्र तरीही पुजा ते मिटविण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्यामुळे तो दोघांना बासर येथे लग्न लावून देतो असे सांगितले. आणि बहिण व गोविंद कराळे यास विश्वासात घेऊन त्यांच्या मोटारसायकलवरून त्यांना भोकरकडे घेऊन आले. त्यावेळी येताना त्यांनी आपली मोटारसायकल भोकर शिवारात थांबवली तेथे गोविंद याच्यावर विळा आणि कत्तीने वार करून ठार मारले. त्यानंतर बहिण पुजा हिच्या गळ्यावर वार केले. या घटनेनंतर रक्तबंबाळ झालेली पुजा रस्त्यावर आली. मदतीसाठी ती धावा करत होती. परंतु कुणीही तिला मदत करत नव्हते. मदत करण्याऐवजी तिचे फोटेो काढण्यात तेथील लोक मग्न होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दिगंबर दासरे आणि चुलत भाऊ मोहन दासरे या दोघांना अटक केली. गुरुवारी खटल्याची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग 1 न्यायाधीश एम.एस.शेख यांच्या न्यायालयात पार पडली. दोन्ही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले. या खून खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. त्या ६ साक्षीदारांची दिलेली साक्ष ग्राह्य मानून त्यांना शिक्षा ठोठावण्यात येईल. सरकारी पक्षातर्फे अड. रमेश राजूरकर यांनी आपली बाजू मांडली. तर बचाव पक्षातर्फे ॲड. मोहन जाधव यांनी आपली बाजू मांडली, तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुशील चव्हाण व जमादार जाधव यांनी तपास केला. खटला कोर्टात चालू असताना बाहेर आरोपीच्या नातेवाईकांनी, मित्रांनी व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोर्टाच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी तगडा बंदोबस्त लावला होता.