औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यावर कलम ३ (१) (१०) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तसेच कुटुंब कल्याण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी आणि प्रशासकीय अधिकारी आर. एम. मोहिते यांच्यावर सुद्धा वेदांतनगर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पिढीत कर्त्या महिलांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले. पीडित महिला प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले कि मी मार्गासवर्गीय असल्याने सरकारी नोकरी करता येऊ नये. या दृष्टीने मानसिक आणि आर्थिक त्रास देणे. अश्लील शब्द बोलून अपमान करणे. आदी आरोप पीडित महिलांनी तक्रारीत करण्यात आले आहेत. या तक्रारीनुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.