बहुजननामा ऑनलाईन
पुणे लष्कर भागात पुलगेट जवळ एका जेष्ठ नागरिकाला चक्कर आल्याने तो जागेवरच कोसळला . त्यावेळेस आकाश चव्हाण या युवकाने रुग्णवाहिका बोलावण्याचा प्रयत्न केला . परंतु रुग्ण वाहिका येण्यास विलंब लागेल असे सांगण्यात आले . त्यावेळेस आकाश चव्हाण , शॉन हॉल , सूरज कांबळे , प्रशांत कंचलवार , चैतन्य कवडे व सोलापूर बाजार पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार व पोलीस शिपाई आबासाहेब धावडे व बांधवानी तात्काळ त्या जेष्ठ नागरिकास रिक्षा मध्ये टाकून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात हलविले . त्या रुग्णालयात तात्काळ वैद्यकीय उपचार केल्याने त्या जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचले .
अशा प्रकारे युवकांनी व पोलिसांनी जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचविले .