बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नगरसेवकाने लॉकडाऊन असतानाही मित्रांसोबत जंगी वाढदिवस साजरा केला आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू आहे. लोक सोशल डिस्टिंसिंग पाळत आहेत. मात्र, नगरसेवकाने नियम धाब्यावर बसवल्याने आदर्श नागरिक कोण असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
भाजप नगरसेवक अजय बेहरा यांनी त्यांच्या 10 मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. 10 मित्रांसोबत बर्थडे पार्टी करताना त्यांनी पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढदिवसानिमित्त पार्टी करताना अटक करण्यात आल्याची राज्यातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा अशा अनेक सूचना माध्यमांमधून, प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून देण्यात येत आहेत. मात्र, अनेकांकडून सोशल डिसटन्स न पाळता नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे नगरसेवक अजय बेहराचा नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा पृश्न विचारण्यात आला आहे.