नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारताचं चांद्रयान 2 मिशन अद्याप संपलेलं नाही. लँडर विक्रमसोबत संपर्क करण्यासाठी इस्रोने पूर्ण ताकद लावली आहे. यासाठी अभियानात आता जगातील सर्वात मोठी स्पेस ऑर्गनायझेशन नासा पुढे आली आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, लँडर विक्रमला आता नासाही मेसेज पाठवत आहे. परंतु हा संवाद एकतर्फीच आहे. म्हणजेच विक्रमकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
नासाने असा पाठवला विक्रमला मेसेज
नासाची जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी(NASA/JPL)ने लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेंसी पाठवली आहे. नासा हे काम डीप स्पेस नेटवर्क(DSN) द्वारे करत आहे. अमेरिकेतील एक अंतराळवीर स्कॉट टिली(Scott Tilley) यांनीही गोष्टीला दुजोरा दिला आहे की, नासाने कॅलिफोर्नियामधील DSN स्टेशनमधून लँडर विक्रमला रेडिओ फ्रिक्वेंसी पाठवली आहे.
#DSN 24 beams ~12KW of RF at the #Moon in hopes of stimulating #Chandrayaan2's lander #VikramLander into communicating with home. Here's a eerie recording of the searcher's signal reflected off the Moon and back to Earth via EME (Earth Moon Earth) on 2103.7MHz. pic.twitter.com/SgOtaIsSYh
— Scott Tilley (@coastal8049) September 10, 2019
मिशन चंद्र आहे अडचणीत
विक्रमचे मिशन चंद्र पूर्ण करण्यासाठी इस्रोकडे फक्त 9 दिवस बाकी आहेत. 21 सप्टेंबर पर्यंत इस्रो लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. यानंतर लुनर नाईटची सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्थिती एकदम बदलून जाईल. 14 दिवसच विक्रमला सुर्यप्रकाश मिळणार आहे. लँडरमधील रोवर प्रज्ञान लँडिंगनंतर चंद्रावर उतरणार होता. प्रज्ञान केवळ 14 दिवसच काम करणार होता.