बहुजननामा ऑनलाइन – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि बलात्कारानंतर मृतदेह जाळण्याची घटना घडली. घटनेच्या 9 दिवसातच पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. बरेच लोक या एन्काऊंटरवर प्रश्न विचारत होते. या प्रकरणात आता महिला डॉक्टरांच्या जळालेल्या शरीराचा डीएनए (DNA) अहवाल आला आहे. अहवालानुसार हा डीएनए महिलेच्या कुटूंबाशी जुळतो आहे.
काय आहे डीएनए अहवालात ?
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी महिला पशुवैद्यकीय डॉक्टरचा डीएनए अहवाल आला. अहवालानंतर हे सिद्ध झाले आहे की, जळलेला मृतदेह महिला डॉक्टरचा होता. डीएनए तपासणीतही हे निश्चित झाले आहे की घटनेच्या ठिकाणी आढळलेल्या सेमिनल डाग चार आरोपींचे होते. महिला डॉक्टरांच्या शरीरातील हाडे डीएनए चाचणीसाठी पाठविली गेली होती. याशिवाय पीडित महिलेच्या कपड्यांमधून सेमिनल सॅंपल घेण्यात आले. असे म्हटले जात आहे की, तपास अधिकारी आणखी काही अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.
त्या रात्री काय झाले ?
हैदराबादच्या सायबरबाद टोल प्लाझाजवळ महिलेचा अर्धा मृतदेह सापडला. महिला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह पेट्रोलने पेटवून उड्डाणपुलाखाली फेकण्यात आला. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकांत केशवुलू आणि शिवा अशी या चौघांची नावे आहेत. ज्यांनी हे कृत्य केले.
अशाप्रकारे एन्काऊंटर झाला
तेलंगणा पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी शस्त्र हिसकावल्यानंतर पोलिसांवर गोळीबार केला. सायबेराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार म्हणाले की, मोहम्मद आरिफ या आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला त्यामध्ये चारही आरोपी ठार झाले.
हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर चार आरोपींच्या पोलिस एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर हे प्रमुख असतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालाडोटा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकें यांनाही या आयोगाचे सदस्य केले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.