नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून अटक केलेल्या डीएसपी दविंदरसिंह प्रकरणात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने कडून
(IB) महत्वपूर्ण माहिती मिळवली असून दविंदरची पत्र २००५ मध्ये अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांसोबत जोडले असल्याचे समोर आले आहे. २००५ मध्ये दिल्ली पोलिसांनी सात संशयित दहशतवाद्यांना अटक केले होते. या आरोपींकडून AK-47 आणि मोठ्या प्रमाणात बनावट चलनही जप्त करण्यात आले होते. तसेच दविंदर सिंह यांनी लिहिलेली एक चिट्ठीही तपास अधिकाऱ्यांना मिळाली होती.
अटक झालेल्या आरोपींवर हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत काम केल्याचा आरोप होता. यातील एकाचे नाव हाजी गुलाम मोईनुद्दीन दार उर्फ जाहिद असे असून त्याच्याकडून एक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आले होते ते कागदपत्र दविंदर सिंह यांनी चिठ्ठीवर सही करून दिले होते. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, ‘ गुलाम मोइनुद्दीन हा पुलवामाचा रहिवासी आहे. ते नेहमीच आपल्याबरोबर पिस्तूल आणि वायरलेस सेट ठेवतात. त्यामुळे सर्व सैन्य दलांना विनंती आहे की, कोणत्याही चौकशीशिवाय त्याला जाऊ द्या. त्यांना कोठेही थांबवू नका.’
आयबीच्या सूत्रांनुसार गुलाम मोईनुद्दीन याच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने दविंदर सिंह यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यासंदर्भात माहितीही मागितली होती. तेव्हा दविंदर सिंह यांनी फोन करून त्या पत्राला खरे ठरवले होते आणि नंतर याच दस्तऐवजाच्या आधारावर दोषीला निर्दोष सोडले होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा