पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता.२१) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
या ठिकाणी अजूनही येथील पालापाचोळ्यात आग धगधगत आहे. काही मोठी झाडेही या आगीत जळाली आहे .कालपासून ते आजपर्यंत जवळपास सोळा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
आग शमली नसल्याने येथे अजूनही अग्निशमन दलाच्या गाड्या पालापाचोळा आणि येथील कचरा हटविण्याचे काम करत आहे. या आगीमुळे पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे .