बहुजननामा ऑनलाईन टीम : SBI एटीएम वापरणार्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला एसबीआयच्या एटीएममधून २००० च्या नोटा मिळणार नाहीत. एसबीआय बँकेसह एटीएममध्ये हळू हळू मोठ्या नोटा कमी होतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आरबीआयच्या सूचनेनंतर एटीएममधून मोठ्या नोटांच्या कॅसेट (बॉक्स) काढण्यास सुरुवात केली आहे.
उन्नाव जिल्ह्यातच जवळजवळ सर्व एटीएममधून या कॅसेट काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच आता ५०० रुपयांच्या नोटाही काढून टाकण्याची तयारी सुरु आहे. एटीएममध्ये फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा राहतील. मिळालेल्या माहितीनुसार छोट्या नोटांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया उन्नावचे मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार यांनी सांगितले की, सुमारे एक वर्षापासून एसबीआयच्या एटीएममध्ये २००० च्या नोटा ठेवलेल्या नाहीत. आता एटीएम मशीनमध्ये २०० च्या नोटांची कॅसेट काढली जात आहे जेणेकरुन इतर नोटा ठेवता येतील.
Visit : bahujannama.com