पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने (Pune Rain) हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (दि.22) पुणे शहरासह परिसरात मुसळधार पाऊस पडला. पुढील 5 दिवस शहर आणि परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD Alert) वर्तवली आहे. तसेच पुढचे दोन दिवस घाट माथ्यावर मुसळधार पाऊस (Heavy rain) पडेल असाही इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
23/7,Latest radar obs frm Mumbai 11.30 am
Very intense clouds r observed over parts of #Raigad district & adj areas Roha Bhira Matheran Shriwardhan #Thane district,Kalyan,Mdk Sagar#Ratnagiri district,Dapoli,Harnai #Chiplun#Satara MWR #Pune ghat areas
Watch for IMD updates pl pic.twitter.com/wogkHiY509— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2021
पुणे शहरात (Pune City) गुरुवारी मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात सांयकाळी 5.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर लोहगाव (Lohgaon) येथे 6.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभाग मुंबईच्यावतीने पुणे जिल्ह्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट जारी केला होता. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहे. दरम्यान आज (शुक्रवार) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर तुरळक पावसाची शक्यता आहे.
Nowcast Warning issued at 1000 Hrs IST dated 23/07/2021:
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Aurangabad, Jalna, Jalgaon, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Pune, Sangli during next 3 hours.-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2021
दरम्यान, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन (Deccan) आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल (Bhide bridge) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आल्याने भीडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
Web Title :- IMD Alert rain for next 5 days in pune city area imd alert
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Shrawan 2021 | भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका ‘या’ 5 गोष्टींचा वापर, जाणून घ्या
Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला