बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर संशोधन सुरू असून, विविध उपाय आणि मार्गदेखील शोधले जात आहेत. यामध्ये सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्ड आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यात येत आहे. सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात मास्कचा ( mask during exercise) वापर करताना दिसून येत आहेत. मास्कचा सतत वापर केल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न होणं, शारीरिक क्रिया करताना त्रास होणं. अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली असून, अमेरिकेमध्ये ( America) या संबंधित संशोधन करण्यात आले आहे.
एनल्स ऑफ अमेरिकन थायरोसीस सोसायटीमध्ये एका नवीन संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अमेरिकन आणि कॅनेडियन संशोधकांच्या एका टीमने असा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये डिस्पेनिया हा आजार वाढत असताना मास्क परिधान केल्याने फुफ्फुसांचा त्रास कमी होतो. मास्कच्या वापरामुळे शरीरावर आणि श्वास घेण्यास परिणाम होतो. परंतु याचा फारसा प्रभाव मानवी शरीरावर पडत नाही. या संशोधनाचे संशोधक सुसान हॉपकिन्स हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसीन येथील औषध आणि रेडिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. या संशोधनात मास्क घातल्यामुळे व्यायाम करताना एका विशिष्ट स्थितीत त्रास होत नसल्याचे पुढे आले आहे. त्याचबरोबर तीव्र हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या व्यक्तींमध्ये श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकत, असं असल्याचे मत या संशोधनात व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला मास्क घालून त्रास झाला तर याविषयी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. या अभ्यासात संशोधकांनी श्वासोच्छवासाचे कार्य धमनी, रक्त वायू, स्नायूंच्या रक्तप्रवाहावर होणारा परिणाम, थकवा, हृदयाचे कार्य आणि मेंदूमधील रक्त प्रवाह यांसारख्या अनेक घटकांचे मूल्यांकन केले होते. याविषयी बोलताना सुसान म्हणाले, मास्क घातल्याने अस्वस्थ होऊ शकते. श्वासोच्छवासाची क्रिया वेगाने होऊ शकते. त्यासाठी तुम्ही काही वेळासाठी मास्क काढून पुन्हा वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला त्रास होत असल्यास तुम्ही मास्क काढून तो पुन्हा घालू शकता.