बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारसह तमाम राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सरकार सतत प्रयत्न करत आहेत की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या मताधिकाराचा (vote in 2024)वापर करावा. यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्रावर सुविधा वाढवण्यासह मतदार याद्या सुस्थितीत ठेवणे, जागरूकता अभियान राबवण्यासह विविध प्रकारे लोकांना प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करत आहे.
यानंतरसुद्धा कुठेही शंभर टक्के मतदान झालेले नाही. यादरम्यान एक न्यूज प्रसिद्ध झाली असून, यामध्ये दावा केला आहे की, जर एखाद्या मतदाराने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केले नाही, तर त्यांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील. मतदान न करणार्याची ओळख आधार कार्डद्वारे होईल. याच कार्डद्वारे पैसे कापण्यात येतील. यासाठी आयोग कोर्टाकडून अगोदर परवानगी घेईल.
एक न्यूज़ आर्टिकल में यह दावा किया जा रहा है कि 2024 लोकसभा चुनाव में जो मतदाता अपने मताधिकार का प्रयोग नहीं करेंगे, चुनाव आयोग द्वारा उनके बैंक खातों से ₹350 काट लिए जाएंगे।#PIBFactCheck: यह दावा फर्जी है। @ECISVEEP द्वारा ऐसा कोई निर्णय नहीं लिया गया है। pic.twitter.com/c6MbGPxROq
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 23, 2020
काय आहे सत्य जाणून घेऊयात
केंद्र सरकार अंतर्गत काम करणार्या प्रेस इन्फॉर्मेशनने या दाव्याची पडताळणी केली असता, ही बातमी पूर्णपणे निराधार आणि खोटी असल्याचे आढळले आहे. पीआयबीने म्हटले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ब्यूरोने म्हटले आहे की, केंद्र सरकारकडूनसुद्धा असा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि निवडणूक आयोगानेसुद्धा बँकांना यासंबंधी कोणताही आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे कोर्टाने असा कोणाताही आदेश देण्याचा प्रश्नच येत नाही. पीआयबीने म्हटले की, त्यांच्या पडताळणीत हा दावा शंभर टक्के खोटा आढळला आहे.
असे करू शकता फॅक्टचेक
जर तुम्हालासुद्धा एखाद्या सरकारी स्कीम किंवा धोरणाच्या सत्यतेवर संशय असेल तर त्यास पीआयबी फॅक्ट चेकसाठी पाठवू शकता. तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा ई-मेलद्वारे पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअॅपद्वारे 8799711259 वर संपर्क करता येईल. याशिवाय ट्विटरवर @PIBFactCheck फेसबुक वर /PIBFactCheck आणि ई-मेलद्वारे pibfactcheck@gmail.com वरसुद्धा संपर्क करू शकता.