बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात पैशांच्या अडचणी सर्वांसमोरच आहेत. परंतु, अशावेळी आपल्या समोर अनेक पर्याय सुद्धा असतात. ज्यामध्ये आपण कमी पैसे लावून चांगली कमाई करू शकतो. होय, ( business)पुन्हा आम्ही एका अशा बिझनेसबाबत आयडीया देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. सध्या थेरेपी आणि डिझायनर कँडलचा ट्रेंड दरदिवशी वाढत चालला आहे. अशावेळी तुम्ही कँडल मेकिंग बिझनेस सुरू करू शकता. हा एक असा बिझनेस आहे, ज्यामध्ये तुम्ही आपल्या बजेटनुसार कमी किंवा जास्त पैसे गुंतवूण घरातून सुरू करू शकता.
डिझायनर कँडल
कँडल्सची मागणी बाजारात सातत्याने वाढत आहे. यासाठी छोट्या सुरूवातीनंतर मोठ्या ब्रँडपर्यंत घेऊन जाण्याची संधी मिळू शकते. कँडल्स अनेक प्रकारच्या असतात. त्या बनवण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतात. जसे की, रोजच्या वापरातील रेग्युलर प्लेन व्हाइट कँडल, विशेष प्रसंगासाठी डिझायनर कँडल. यासाठी बिझनेस सुरू करण्यापूर्वी हे ठरवा की कोणत्या प्रकारच्या कँडल्स बनवण्याचा बिझनेस तुम्हाला करायचा आहे.
अरोमाथेरेपीमध्ये यूज होतात या कँडल्स
सध्या अनेक थेरपी केल्या जातात, ज्यापैकी एक आहे अरोमाथेरेपी. अरोमाथेरेपीसाठी फ्रेंगरंस कँडल्सचा विशेष प्रकारे वापर होतो. या कँडल बनवून कमाई करता येते.
घरातून सुरू करा कँडल बनवण्याचा उद्योग
कँडल बिझनेससाठी आवश्यक रॉ मटेरियल आणि इक्विपमेंटची व्यवस्था सुद्धा आवश्यक आहे. बाजारात कोणत्या प्रकारच्या कँडल्सला सर्वात जास्त मागणी आहे, त्यानुसार आपले प्रॉडक्ट ठरवा. पुढील प्लॅन आहे बिझनेस प्लॅन बनवून कॅपिटल जमा करणे. कमीत कमी 10 हजार रुपयांत हा बिझनेस सुरू केला जाऊ शकतो.
बँक लोन, सरकारी योजनांचा फायदा घ्या
प्रॉडक्ट टाइपच्या हिशेबाने जर तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची व्यवस्था करू शकत नाही तर छोट्या उद्योगांसाठी बँक लोन किंवा सरकारी योजनांची मदत घेऊ शकता.
बिझनेससाठी जागा निश्चित करा
कँडल बनवणे, पॅकिंग करणे आणि तयार माल ठेवण्यासाठी तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जर घरातूनच बिझनेस सुरू करणार असाल तर त्यासाठी वेगळी खोली असणे आवश्यक आहे. या व्यवसायासाठी वेगळी खोली भाड्याने सुद्धा घेता येऊ शकते.
आकर्षक ब्रँड नेम ठेवा
आपल्या प्रॉडक्टच्या ब्रँडच्या नावानेच बाजारात तुमची ओळख असते. यासाठी बिझनेसच्या ब्रँडचे नाव आकर्षक ठेवा. रजिस्ट्रेशन आणि आवश्यक लायसन्ससह बिझनेस सुरू करा.
पॅकिंगकडे लक्ष द्या
प्रॉडक्ट बनवल्यानंतर त्याला चांगले मार्केट देण्यासाठी पॅकेजिंगकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही सजावट किंवा फ्रेगरंस कँडल्स बनवत असाल तर त्याचे पॅकेजिंग मजबूत असण्यासह आकर्षक सुद्धा असायला हवे.