बहुजननामा ऑनलाइन टीम – आलिशान कारमधून उतरणे, अंगावरील उंची कपड्यांची इस्त्रीही न मोडू देणे सध्याच्या आमदाराचे गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. आमदारांचे सर्वसामान्य माणसाला कौतुक तर असतेच, त्याचा रुबाब, बडेजाव पाहून माणूस अवाक् होतो. पण तोच आमदार एखाद्या अपघातग्रस्त शेतक-याच्या मदतीला धावून येत काट्यात गेलेले वाहन बाहेर काढण्यासाठी ढकलत असेल,(Rohit Pawar’s help) तर नवल वाटायला नको.
खटाव – माणच्या सहरहद्दीवर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि. 18) दहिवडीतील एका अपघातग्रस्त शेतक-याला मोलाची मदत (mla-rohit-pawar-help-accidentally-farmer-kaledhon-satara)केली. ती करताना उपस्थितांनी रोहितदादांना जरा संभाळून म्हणताच, दादा, मला याची सवय आहे असे म्हणताच उपस्थित शेतक-यांच्या मनातही त्यांनी जागा निर्माण केली. आमदार रोहित पवार यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी चुणूक माण- खटावच्या दुष्काळी तालुक्यातील मांडवे (ता. खटाव) येथे दिसून आली. खटाव- माण तालुक्याच्या हद्दीवर दहीवडी (ता.माण) येथील दामोदर काटकर या शेतक-याच्या व्हॅनला अपघात होऊन त्याची व्हॅन रस्त्याच्या कडेला काट्यात गेली होती. यात काटकर हेदेखील जखमी झाले होते. दरम्यान, त्याचवेळी या मार्गावरून आ. पवार व त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि मातोश्री सुनंदा पवार हे कराड येथील त्यांच्या नातेवाईकाना भेटून वडूज-दहिवडी मार्गे गोंदवले येथे निघाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत वडूजचे छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, शेखर जाधव, मुन्ना मुल्ला आदी प्रवास करत होते. आ. पवार यांनी गाडी थांबवत खाली उतरून त्या अपघातग्रस्त शेतक-याला वाहनाबाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली अन् तेथून ते पुढे मार्गस्थ झाले.