बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : यावर्षी 2022 किंवा 2027? अखेर कोरोना व्हायरसचा प्रकोप कधी नष्ट होणार? सर्वांना हाच प्रश्न पडला आहे. परंतु अंदाज काय आहे ते जाणून घेता येऊ शकते. भारतासह अनेक देशांमध्ये व्हॅक्सीनेशन कार्यक्रम सुरू झाला आहे. व्हॅक्सीनचे दोन शॉट चार आठवड्याच्या गॅपमध्ये दिले जातात. कोट्यवधी लोकांना दोन शॉट देण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण व्हॅकसीनचे उत्पादन हा सुद्धा फॅक्टर आहे. अशावेळी जगात कोरोना कधी नष्ट होईल, याचे उत्तर व्हॅक्सीन कॅलक्युलेटरच्या हिशोबाने काय आहे ते जाणून घेवूयात.
अमेरिकेच्या अँथनी फॉकी सारख्या विज्ञान तज्ज्ञांनी म्हटले आहे की, 70 ते 85 टक्के लोकसंख्येला जोपर्यंत लस दिली जात नाही तोपर्यंत महामारीचा प्रकोप संपला असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे, जगभरात व्हॅक्सीन ज्याप्रकारे दिली जात आहे, त्यातून मिळालेल्या डेटाचे सर्वात मोठे सेंटर एका मीडिया हाऊसने तयार केले आहे. याच्या हिशेबाने आकडे काय आहेत आणि त्यांच्या हिशेबाने कोणता अंदाज आहे ते जाणून घेवूयात.
कसे होत आहे व्हॅक्सीनेशन?
इस्त्रायल सर्वात वेगाने लसीकरण करत आहे. केवळ दोन महिन्यात येथे 75% लोकसख्येला लस दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु दुसरीकडे, अमेरिका आणि फ्रान्ससारखे मोठे देश आहेत, जिथे व्हॅक्सीन कार्यक्रम जवळपास ठप्प झाला आहे. सप्लाय चेन, उत्पादन आणि भ्रष्टाचारात व्हॅक्सीनचा गोंधळ उडाला आहे. येथे व्हॅक्सीन देण्याचा वेग खुप संथ आहे. तिसरी बाजू भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांची आहे, जिथे एक अरबपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन पोहचवण्याचे लक्ष्य आहे.
या अनेक स्थिती लक्षात घेऊन डेटाबेसच्या आकड्यांनसुार जगात एक सरासरी तयार केली जात आहे की, लोकांपर्यंत व्हॅक्सीन कोणत्या वेगाने पोहचत आहे. या हिशेबाने तयार करण्यात येत असलेल्या विश्लेषणानुसार हे सुद्धा पाहिले जात आहे की, 75% लोकसंख्येला कधीपर्यंत व्हॅक्सीन मिळू शकते.
का कमी होतेय लसीकरणाची गती?
उदाहणार्थ न्यूयॉर्कमध्ये हिवाळ्यामुळे अनेक लोकांना व्हॅक्सीन देता येत नाही, आता लक्ष्य वाढवून म्हटले आहे की, येथे 17 महिन्यात लसीकरण पूर्ण होईल. अशाच प्रकारे कॅनडामध्ये लसीकरणाचा वेग यासाठी कमी झाला आहे की इथे व्हॅक्सीनचा साठा पोहचण्यास उशीर होत आहे. जर कॅनडामध्ये लसीकरणाचा वेग आदर्श मानला तर 75% लोकसंख्येला लस देण्यासाठी 10 वर्ष लागतील.
ब्लूमबर्गनुसार, आतापर्यंत अनेक देशांनी 100 पेक्षा जास्त अॅग्रीमेंटसह 8.5 अरब व्हॅक्सीन डोसची बुकिंग पूर्ण केली आहे. तर जगातील केवळ एकतृतियांश देशांत लसीकरण सुरू झाले आहे.
या वेगाने जर लसीकरण चालत राहिले तर संपूर्ण जगाला व्हॅक्सीन मिळण्यासाठी 7 वर्ष लागतील. याचा अर्थ आहे की 7 वर्षात सुमारे 75% लोकसंख्येला लस मिळाली, तर एक ग्लोबल हर्ड इम्यूनिटी विकसित होईल आणि कोविड 19 चा खात्मा होईल. परंतु येथे एक प्रश्न अजून आहे तो म्हणजे तज्ज्ञांमध्ये अजूनही हर्ड इम्युनिटीबाबत एकमत नाही.