मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 37 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. महेश भट्ट यांचा जबाब एक किंवा दोन दिवसांमध्ये नोंदविला जाणार आहे. कंगना रणौतला सन्मस पाठविण्यात आले आहे तर करण जोहरच्या मॅनेजरला जबाबासाठी बालाविण्यात आले आहे. गरज पडली तर करण जोहरला देखील बोलाविण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
Statements of 37 people recorded so far, Mahesh Bhatt to record his statement in a day or two. Summons sent to Kangana Ranaut to record her statement. Karan Johar's manager has been called, if needed,Johar will also be called:Maharashtra Home Minister on Sushant Singh Rajput case pic.twitter.com/HllpYbRuoz
— ANI (@ANI) July 26, 2020
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांकडे चौकशी करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे. त्याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा नुकताच प्रदर्शित झाला. त्याला रेटिंग देखील अफलातून मिळालं आहे.