ICICI Bank | आयसीआयसीआय बँकेनेही घेतला मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ICICI Bank | भारताची सर्वात मोठी असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) काही दिवसापूर्वी एटीएम, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल केले होते. याबाबत सूचना SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना दिल्या होत्या. आता आणखी एका बँकेनं नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. भारतातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक म्हणजे ICICI Bank बँकेने ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्यापासून सुधारित नियम लागू होणार आहेत. यामध्ये बचत खाते आणि सॅलरी खाते दोन्हींसाठी बंधनकारक असणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढील महिनाभरात मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या 6 महानगरांमध्ये बँकेचे पहिले 3 व्यवहार नि:शुल्क असणार आहेत. उर्वरित ठिकाणी ही मर्यादा 5 व्यवहारांची असणार आहे. त्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी प्रत्येकी 20 रुपये आणि अन्य व्यवहारांसाठी 8.50 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या सिल्व्हर (Silver), गोल्ड (Gold), मॅग्नम (Magnum), टायटेनियम (Titanium) आणि वेल्थ कार्डधारकांसाठी (Wealth card) हे शुल्क लागू असणार आहे.
ATM मधून फक्त 4 वेळाच पैसे मोफत काढता येतील –
दरम्यान, होम शाखेच्या एटीएममधून केवळ 4 वेळा पैसे मोफत काढता येणार आहे. त्यापुढील व्यवहारांसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच दुसऱ्या शाखेशी 25 हजार रुपयांपर्यंत नि:शुल्क आर्थिक व्यवहार होऊ शकतात. परंतु, त्यानंतर प्रत्येकी हजार रुपयांच्या व्यवहारावर 5 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. .
चेकबुकचं काय?
एका वर्षात 25 पानी चेकबुक नि:शुल्क मिळणार आहे. त्यानंतर 10 पानी चेकबुकसाठी प्रत्येकी 20 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
सॅलरी खात्यात बदल?
आयसीआयसीआय बँकेच्या बचत आणि सॅलरी खातेधारकांना प्रत्येक महिन्यात 4 आर्थिक व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर प्रत्येकी एक हजार रुपयांच्या व्यवहारासाठी 5 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहेत.
Web Title : icici bank revise charges for atm cash withdrawals cheque book and others know
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा
Covid 19 | हवेत आहे का कोरोना? आता ‘या’ डिव्हाईसने समजू शकते, जाणून घ्या कसं काम करतो
Comments are closed.