वृत्तसंस्था – स्वातंत्र्यदिनी वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांना वीर चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच बरोबर स्कॉडरन लिटर मिन्टी अग्रवाल यांना युध्द सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमक झाली होती. त्याबाबत संपुर्ण जग सर्वश्रुत आहे.
२७ फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्या मिग – २१ ने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचा पाठलाग करून एक विमान पाडले होते. चकमकीदरम्यान शत्रुने सोडलेले मिसाईल अभिनंदन यांच्या विमानाला लागल्याने त्यांना विमान सोडून द्यावे लागले होते. अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत उरतले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा अमानुष छळ केला. त्यांना अटक देखील करण्यात आली होती.
भारताच्या दबावासह आंतरराष्ट्रीय दबावामुळे ६० तासाच्या आत पाकिस्तानला अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करावे लागले होते. अभिनंदन यांच्या बहाद्दूरीबद्दल त्यांना वीर चक्र देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी त्यांना वीर चक्र देऊन् सन्मानित करण्यात येणार आहे.