सांगली : बहुजननामा ऑनलाईन – सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सांगली दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते बोलले कि धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे.याची सुरुवात आम्ही केली होती आणि शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी कमिशनला या आधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असेही जानकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवरचा आहे. आणि राज्य सरकारकडूनही याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार हे शिफारस करण्याबरोबर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे . त्याचबरोबर धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. आता राजकीय आरक्षण हे बाकी आहे. त्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार असा विश्वासही मंत्री जानकार यांनी व्यक्त केला.
देशातील ओबीसी कमिशनला याआधी कोणताही घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र नरेंद्र मोदी यांनी ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा दिला आहे, त्याच बरोबर धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून १ हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले.