कर्जत-जामखेड : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला. त्यावेळी उद्धव यांच्यासह सात जणांनी शपथ घेतली होती. मात्र अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे. कोणाला कोणते मंत्रिपद भेटते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास सोनं करू, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. रोहित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र संधी मिळाल्यास सोनं करू.
रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मतदारसंघातल्या विविध समस्यांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली. मंत्रिपदाची अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. बोलणारे बोलतच असतात. मी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत आहे. मंत्रिपदासारखी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं. त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिली तर सोनं करेन, अशी इच्छा बोलून दाखवली. ‘काम करणाऱ्यांना संधी मिळायला हवी, अशी लोकांची इच्छा असते.
रोहित पवार यांनी त्यावेळी असा विश्वास व्यक्त केला की, अहमदनगर जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. ‘आपल्याला आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. अहमदनगर जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. मात्र पक्ष वैयक्तिक आवडींवर चालत नाही. पक्ष चालवताना अनेक घटकांचा आणि समीकरणांचा विचार केला जातो. पण मला संधी मिळाल्यास तिचं सोनं करेन,’
Visit : bahujannama.com