मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास तर मी वडोदरा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करीन असं मत प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय याने व्यक्त केलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्यात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत . या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचं आयुष्य अत्यंत प्रेरणादायक आहे अशी भावना विवेक ओबेरॉयने व्यक्त केली आहे. राजकारणात येण्याची इच्छा आहे का असं विचारलं असता विवेक म्हणाला, ’ मला राजकारणात यायला निश्चित आवडेल. तशी संधी मिळालीच तर २०२४ मध्ये वडोदरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मी विचार करीन. वडोदराच्या लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विशेष प्रेम आहे’.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतात जरी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाची रिलीज डेट , सतत पुढे ढकलली जात असली तरी हा सिनेमा भारतासोबतच ३७ इतर देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यापैकी जपान, अमेरिका, कॅनेडा, या देशांमध्ये या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.