बहुजननामा ऑनलाइन टीम – बिग बॉस 13 फेम आणि फेमस पंजाबी सिंगर शहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill) हिचे वडील संतोख सिंग सुख (Santokh Singh Sukh) यांनी पुन्हा कधीच तिच्याशी न बोलण्याचा निर्धार करत तशी शपथ घेतली आहे. तिच्या वडिलांनी अशी तक्रार केली आहे की, शहनाज गेल्या आठवड्यात चंदीगडमध्ये असूनही घरी आली नव्हती. (Shahnaz Gill’s father)त्यांनी असंही म्हटलं आहे की, एका म्युझिक व्हिडिओसाठी शहनाज चंदीगडला आली होती. तिथून तिचं घर फक्त 2 तासांच्या अंतरावर होतं, परंतु तिनं कुटुंबीयांना भेटणं टाळलं.
एका मुलाखतीत बोलताना संतोख सिंग म्हणाले, एका म्युझिक व्हिडिओसाठी शहनाज चंदीगडला आली होती. तिथून तिचं घर फक्त 2 तासांच्या अंतरावर होतं. तरी ती कुटुंबीयांना भेटू शकली नाही. ती चंदीगडमध्ये आली होती हेही मला वृत्तवाहिन्यांमधून समजलं. नुकतंच तिच्या आजोबांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. त्यांना एकदा भेटण्याची तसदीही तिनं घेतली नाही.
ते म्हणाले, मी शपथ घेतलीय की, मी आता तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही. माझ्याकडे तिच्या मॅनेजरचाही नंबर नाहीये. माझ्या खूप जवळचे काही मित्र आहेत. त्यांना शहनाज सोबत फोटो काढायचा होता. तिच्याकडं यासाठी विनंती केली असता, यासाठी वेळ नाही असं सांगत स्पष्ट नकार दिला. तिच्याकडे आमच्यासाठी अजिबात वेळ नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.