औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – ‘एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचं समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडं नाही,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांची ही भूमिका म्हणजे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पक्ष नेतृत्वावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी गुरुवारी शरद पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्च्यांना उधाण आलं होते. औरंगाबाद येथे शरद पवारांना त्याबाबत विचारले असता त्यांनी चर्चेतील हवाच काढून टाकली. ‘खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडं नाही,’ असं ते म्हणाले.
ओठाला लाली आणि तोंडाला पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकी देखील बंद करून घ्यावी शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं आता खडसे नेमकी काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ खडसे यांनी आपण पक्षातच राहणार आहे असे याआधीच स्पष्ट केलं आहे. खडसे यांची नाराजी दूर करण्यात येईल असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळं एकनाथ खडसे यांच्या गाठीभेटी हे पक्षावर दबाव वाढवण्याचं तंत्र आहे का,अश्या चर्च्यांना उधाण आलं आहे.
Visit : bahujannama.com