बहुजननामा ऑनलाइन टीम : दहा दिवसांपुर्वी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर ४ तरुणांनी बलात्कार करुन तिला जाळून मारण्यात आले. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यामध्ये ४ आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी सज्जनार यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात हैदराबाद पोलिसांनी हा एन्काऊंटर केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पोलिसांनी या चार आरोपींना घटनेचा तपास करण्यासाठी जिथे घटना घडली तिथेच नेले. तिथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात या चार आरोपींचा मृत्यू झाला. याप्रकरणामध्ये सज्जनार यांनी यंत्रणांमध्येही गतीमान कामगिरी केली आहे. सज्जनार हे १९९६ च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तसेच, स्पेशल इंटेलिजन्स ब्रॅंचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रॅंचच्या डेप्यूटी आयजी पदही त्यांना कामकाज केले आहे.
साबराबदच्या कमिशनरपदी नियुक्ती झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, मुलं आणि महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचं सज्जनार यांनी म्हटंल होतं. जनगाव येथून अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून सज्जनार यांनी आपल्या आपीएस करिअरची सुरुवात केली आहे. हैदराबाद पोलिसांच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियातून तेलंगणा पोलीस आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांचं कौतुक होत आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ‘दिशा’ बलात्कार प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, दोषींना कडक शिक्षा ठोठावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचेही राव यांनी सांगितले होते. मात्र, हैदराबाद पोलिसांच्या या एन्काऊंटरमुळे 8 दिवसांतच याप्रकरणाचा निकाल लागला आहे.
पीडीतेच्या जळालेला मृतदेहाचा फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. स्कूटरजवळ उभी असताना दिशाने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भिती वाटते आहे, असे तिने बहिणीला सांगितले होते. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडीताच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ६ वाजता दुधवाल्याला तिचा जळालेला मृतदेह आढळला.
Visit : bahujannama.com