बहुजननामा ऑनलाईन टीम : हैद्राबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि तिला जिवंत जाळून हत्या केल्याच्या घटनेनें संपूर्ण देश हादरला होता. पोलिसांनी ४८ तासांत आरोपींचा शोध घेत ४ जणांना ताब्यात घेतलं होत. आरोपींना अटक केल्याच्या अवघ्या ७ दिवसांत आज सकाळी या आरोपींना एन्काऊंटर मध्ये ठार मारण्यात आलं आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे देशभरातून तेलंगणा पोलिसांचे कौतुक करण्यात येत असून त्यांचे आभारही मानले जात आहे. दुसरीकडे मात्र काहींनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत कायद्याच्या चौकटीत राहूनच आरोपींना शिक्षा द्यायला हवी होती असे मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे, नेमकी पोलिसांना हि थेट कारवाई का करावी लागली ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
शमशाबाद परिसरात मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चार आरोपींनी पीडित तरुणीला गाठलं होतं. आरोपींनी तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न करत चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने प्रतीकार करण्यास सुरुवात केल्याने आरोपींनी गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं. पोलिसांनी २९ नोव्हेंबरला या आरोपींना अटक केली होती.
DCP Shamshabad Prakash Reddy: Cyberabad Police had brought the accused persons to the crime spot for re-construction of the sequence of events. The accused snatched weapon and fired on Police. In self defence the police fired back, in which the accused were killed. #Telangana https://t.co/4wAH9W8g3O
— ANI (@ANI) December 6, 2019
शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपींना त्याच ठिकाणी नेण्यात आलं, ज्या ठिकाणी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस जखमी झाल्याचेही समजते आहे. त्यामुळेच पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात या चौघांचा खात्मा करण्यात आला.
Visit : bahujannama.com