हैद्राबाद : बहुजननामा ऑनलाईन – हैदराबाद सामूहिक बलात्काराचे चार आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले आहेत. ही चकमक राष्ट्रीय महामार्ग -४४ जवळ घडली. या प्रकरणात चार आरोपींच्या मृतदेहाचे फोटो समोर आले आहेत. आरोपींचे मृतदेह एकमेकांपासून थोडेही दूर आहेत.
हैदराबाद रेल्वे स्थानकापासून २४ किलोमीटर अंतरावर शमशाबाद टोल प्लाझाजवळ रिक्त मैदानावर पीडित मुलीसह सामूहिक बलात्काराची घटना घडली. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ घटनास्थळाजवळ आहे. आरोपींवर एनकाउंटर केले गेले. हे चार मृतदेह एकमेकांपासून २० ते ३० फूट अंतरावर सापडले आहेत.
सीन रिक्रिएशनसाठी घेऊन गेले होते पोलीस !
आरोपींचे एनकाउंटर त्याच ठिकाणी घडले जिथे त्यांनी ही घटना घडविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे आरोपीनं सीन रिक्रिएशनसाठी नेण्यात आले. आरोपींचे मृतदेह जिथे पडून आहेत तेथे पोलिसांनी घेरा घातला आहे.
एनकाउंटरची जागा :
ज्या ठिकाणी एनकाउंटर झाले त्या ठिकाणी एकच घर होते. त्या घराच्या सदस्याने सांगितले की, पहाटे चारच्या सुमारास त्याने गोळीबार करणारे चार पाच आवाज ऐकले. घटनेचा आणि त्याच्याशी संबंधित तथ्यांचा कायदेशीर तपास चालू आहे. हैदराबादच्या गांधी रुग्णालयातील पाच जणांची टीम फॉरेन्सिक तपासणीसाठी आली आहे.
Visit : bahujannama.com