नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्याच्या सर्व आरोपींच्या चकमकीचे रहस्य अधिकच तीव्र होत आहे. या चकमकीचे सत्य जाणून घेण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयाने चार मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे हैदराबादच्या गांधी रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने मृतदेह जास्त काळ सुरक्षित ठेवला जाणार नाही अशी चिंता व्यक्त केली होती. मृतदेहांबाबत काही सूचना देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाने कोर्टाकडे केली होती.
कोर्टाने याप्रकरणी सुनावणी करताना म्हटले आहे की चकमकीशी संबंधित तथ्य शोधण्यासाठी दिल्लीची तज्ज्ञ पथक पुन्हा एकदा मृतदेहांचे शवविच्छेदन करू शकेल. ते म्हणाले की, यासाठी रुग्णालयातील अधिकाऱ्याकडे मृतदेहांच्या अवस्थेबद्दल विचारणा केली गेली आहे. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी घेताना चकमकीतील चार आरोपींच्या मृतदेहचे पुन्हा पोस्टमार्टम करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Telangana High Court orders re post mortem of the bodies of the four accused, which have been preserved in Gandhi Hospital mortuary. #TelanganaEncounter pic.twitter.com/wileKBJgpm
— ANI (@ANI) December 21, 2019
एन्काऊंटरमधील चार आरोपींच्या हत्येच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच तीन सदस्यांची चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगात मुंबई उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश रेखा बाल्डोटा आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेयन यांचा समावेश आहे. चौकशी आयोग आपला अहवाल ६ महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात सादर करेल.
Visit : bahujannama.com