बहुजननामा ऑनलाईन : हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अटक केलेल्या चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता एन्काऊंटर करून ठार करण्यात आले. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी या चारही आरोपांची नावे आहेत. या आरोपींना तेलंगणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना बलात्कार केलेल्या घटनास्थळी नेले असता आरोपींनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी या चौघांचा पोलिसांनी एन्काउंटर करून खात्मा केला. त्यानंतर मृत आरोपींची डीएनए चाचणी करण्यात आली. मात्र, आरोपींचे मृतदेह स्वीकारण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. त्यामुळे आता तेलंगणा पोलिसच आरोपींचे अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
२७ नोव्हेंबर बुधवारी रात्री महिला डॉक्टर रुग्णालयातून घरी जात असताना तिच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे पीडित महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी चार आरोपींनी पीडितेवर बलात्कार करून तिला मद्यपान करण्यास भाग पाडले , मात्र तिने प्रतिकार करण्यास सुरुवात करताच आरोपींनी तिची गाला दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनीं तिचा मृतदेह जाळला.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांनी ही मुलं आमच्यासाठी मेली असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आरोपी जोल्लू शिवाचे वडील जोल्लू राजप्पा यांनी असल्या मुलगा कशाला पाहिजे अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. तर जोल्लू नवीनची आई लक्ष्मी यांनी माझा मुलगा नाकारला असून चेन्नाकेशवुलुची जयम्मा यांनी चेन्नाकेशवुलुने चुकी केलीय त्याला कठोर शिक्षा करा असे सांगितले होते.