Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?

Hybrid funds hybrid mutual funds definition types and benefits investor.

नवी दिल्ली :  Hybrid Fund | म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करणे सर्वात योग्य आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. अनेक प्रकारचे चांगले म्युच्युअल फंड बाजारात आहेत, ज्यांच्याद्वारे आपण आपले पैसे गुंतवू शकतो. यापैकीच एक हायब्रिड फंड (Hybrid Funds) आहे. जेव्हापासून शेयर बाजारात तेजीचा कल आहे हायब्रिड फंडमध्ये
लोकांची (Hybrid Fund) गुंतवणूक पुन्हा सुरू झाली आहे.

गुंतवणुकदारांची सातत्याने पसंती या फंडला मिळत आहे. तर हायब्रिड फंड (Hybrid Fund) काय आहे आणि यास म्युच्युअल फंडपेक्षा वेगळा का मानला जातो? हायब्रिड फंडमध्ये कुणी गुंतवणूक करावी? ते जाणून घेवूयात.

हायब्रिड फंड काय आहे (What is a hybrid fund)?

हायब्रिड फंड ती म्युच्युअल फंड स्कीम आहे जी इक्विटी आणि डेट दोन्हीत गुंतवणुक करते. हा अशाप्रकारचा एकच फंड आहे जो अनेक प्रकारच्या असेट एसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतो. जर बाजारात जोखीम कमी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हायब्रिड फंड चांगला पर्याय आहे.

कारण, यामध्ये रिस्क कमी असून सोबतच रिटर्न सुद्धा जास्त मिळतो. सध्या कोरोनामुळे बाजारात खुप काही अजून सावरलेले नाही. तिसर्‍या लाटेची सुद्धा अजून लोकांमध्ये आहे. यामुळे गुंतवणुकदारांसाठी कमी रिस्कचा फंड म्हणजे हायब्रिड फंड  योग्य मानला जात आहे.

 किती प्रकारचे असतात हायब्रिड फंड?

हायब्रिड फंड (Hybrid Fund) प्रामुख्याने 6 प्रकारचे असतात. ज्यांच्याद्वारे पैसे डेट, इक्विटी किंवा सोन्यात गुंतवले जातात.

1. अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड (aggressive hybrid fund) –

– इक्विटीमध्ये 60 ते 80 टक्के गुंतवणूक

– 20 ते 30 टक्केची गुंतवणूक डेटमध्ये

– पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक योग्य

2. कंजर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड (conservative hybrid fund) –

– 10 ते 25 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये

– उर्वरित रक्कमेचा डेट असेटमध्ये वापर

– स्थिर किंवा नियमित उत्पन्नासाठी लाभदायक

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

3. डायनेमिक असेट अलोकेशन फंड (dynamic asset allocation fund) –

– फंडचा वापर डायनेमिक पद्धतीने असेट क्लासमध्ये केला जातो

– 100 टक्के गुंतवणूक इक्विटी किंवा डेटध्ये केली जाते

4. मल्टी असेट अलोकेशन फंड (multi asset allocation fund) –

– इक्विटी, गोल्ड आणि डेट तिनही असेट क्लासमध्ये गुंतवणूक होते.

– 65 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये

– 20 ते 30 टक्के गुंतवणूक डेट असेटमध्ये

– 10 ते 15 टक्के गुंतवणूक गोल्डमध्ये होते

5. आर्बिट्राज फंड (arbitrage fund)

– एकुण असेटच्या किमान 65 टक्के इक्विटीशी संबंधीत साधनांमध्ये गुंतवणूक

6. इक्विटी सेव्हिंग फंड (equity savings fund) –

– इक्विटी, डेट आणि आर्बिट्राजमध्ये होते गुंतवणूक

– एकुण असेटच्या 65 टक्के गुंतवणूक शेयरमध्ये आवश्यक

– 10 टक्के गुंतवणूक डेटमध्ये करणे अनिवार्य

रिटर्न कसा मिळतो?

हायब्रिड फंड (Hybrid Fund) नेहमी चांगला रिटर्न देतात. फंड निवडण्यापूर्वी जोखीम, गुंतवणूक करण्याचे लक्ष्य आवश्य समजून घ्या. 5 ते 7 वर्षापर्यंत गुंतवणुकीतून 20 ते 30 टक्केपर्यंत रिटर्न शक्य.

इंडियाचे काही टॉप हायब्रिड फंड :

(SOURCE: Sonam Gupta, Co-Founder, Wright Research)

1. Quant Absolute Fund

2. ICICI Prudential Thematic Advantage Fund (FOF)

3. BNP Paribas Substantial Equity Hybrid Fund

4. Canara Robeco Equity Hybrid Fund

वर दिलेल्या सर्व फंडचा वार्षिक रिटर्न 20 ते 30 टक्केच्या दरम्यान राहिला आहे.

 

web title : Hybrid funds hybrid mutual funds definition types and benefits investor.

 

Sangli News | एकरकमी FRP चे आंदोलन सांगली जिल्ह्यात हिसंक वळणावर; राजारामबापू, क्रांती साखर कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविले

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,016 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून ‘मोक्का’ कारवाई

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या भावात कमालीची वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर