मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पटनातील सर्वात पॉश परिसरात असलेल्या पाटलिपुत्र कॉलनीत सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट व्हॉट्सअॅपवरुन चालवले जात होते. परदेशी मुलींनाही येथे बोलवले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह तीन जणांना अटक केली आहे. ग्रँड अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर डी -८ वरून सेक्स रॅकेट चालविण्यात आल्याची बातमी पोलिसांना मिळाली.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलींची फोटो ग्राहकांना पाठविण्यात येत होती आणि या फ्लॅटमध्ये ग्राहकांना बोलविण्यात येत होते. सोमवारी रात्री पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या फ्लॅटवरून पोलिसांनी मुख्य आरोपी संजीत कुमार, त्याची पत्नी राणी थापा आणि सुनील कुमार नावाच्या व्यक्तीला अटक केली.
सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले त्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की संजीत कुमार हे पटनातील रहिवासी आहेत, तर त्यांची पत्नी राणी थापा बोकारोची रहिवासी आहे. सुनील कुमार हा देखील बोकारोचा रहिवासी आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो गेल्या ५ वर्षांपासून या फ्लॅटवरून सेक्स रॅकेट चालवत होता. ग्राहकांकडून एका तासासाठी ५ हजार तर २ तासांसाठी दहा हजार रुपये आकारण्यात येत असे. दिल्ली, कोलकाता आणि बांगलादेशमधील मुलींनाही ग्राहकांच्या मागणीनुसार बोलावण्यात येत होते, असे आरोपी म्हणाले.