लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. तर काही व्हीडीओमधून एखाद्या व्यक्तीच्या कृत्याची पोलखोल होते. अशीच एक उत्तर प्रदमधील घटना व्हिडीओमुळे समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पतीने कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहून तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याच पत्नी विरोधात तक्रार केली. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पत्नी आपल्याच मुलांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसत होते. पोलिसांनी विचारणा केली असता, पत्नीने मुलांना मारहाण करत असल्याची कबुली दिली. मात्र का करत होती हे मात्र तिने पोलिसांना सांगितले नाही. पोलीस तिच्याकडे कसून चौकशी करत आहेत, मात्र तिने अद्याप काहीही सांगितले नाही.