बहुजननामा ऑनलाईन – भारतात महिला आपल्या स्वतःच्या कामगिरी आता कुठेच्या कुठे जाऊन पोहचल्या आहेत. सध्या असच कोणतंच क्षेत्र नाही की तिथं महिला जाऊन पोहचल्या नाहीत. मात्र एवढे असतानाही जुन्या रूढी परंपराना धरून अनेक महिलांवर अजूनही अन्याय अत्याचार होत आहेत. अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील सीतापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अतिशय खळबळ जनक घटना घडली आहे. हुंड्यात दुचाकी न दिल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला. एव्हड्यावरच न थांबता त्याने पत्नीचे नाक देखील कापले. जखमी अवस्थेत पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीतापूर येथील खिराबाद कस्बे परिसरातील तुर्क पट्टी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ठाणा आणि नगर परिसरातील तुर्कपट्टीत राहणारी रुखसानाचा निकाह बरकत अली याच्यासोबत १४ मे २०१९ रोजी झाला होता. निकाहच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीने तिला तलाक दिला. व त्याच्या घरातून तिला लगेच घराबाहेर काढले. तिच्या पतीने तिच्याकडे ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. हे तिने तिच्या माहेरच्यांना सांगितले म्हणून, तिच्या नातेवाईकांनी बरकतच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी बरकतच्या घरच्या मंडळींनी हुंड्यात दुचाकी न दिल्याने पत्नीचा स्वीकार करण्यास नकार दिला. रुखसानाने तिच्या पतीला फोन केला. त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली. त्यानंतर ३ ऑगस्टला सकाळी ९ वाजताच्या सुमारास रुखसानाला तिच्या नवऱ्याला फोन केला आणि दुचाकी न मिळाल्याने पत्नीस फोनवरच तिहेरी तलाक दिला.
दरम्यान तिने या तिहेरी तलाकबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे जेव्हा तिच्या पतीला सांगितलं तेव्हा पतीने तिला तक्रार मागे घेण्यास आग्रह केला. मात्र, पत्नीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने त्याने तिचं नाक कापलं. यानंतर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. रुखसानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तिहेरी तलाक विधेयकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.