बहुजननामा ऑनलाइन टीम – पतीनेच पत्नीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक(Husband accuses wife ) केले. स्वत: एका मुलासाेबत चॅटिंग करत असल्याचे भासविले. आणि पत्नीला तुझे बाहेर संबंध असल्याचा आरोप करुन घटस्फोट दे अशी धमकी दिली. दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१२ मे २०१९ ते २७ एप्रिल २०२० दरम्यान अप्पर इंदिरानगर येथे हा प्रकार घडला. असं फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी २३ वर्षाच्या विवाहितेने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीवर त्याच्या नातेवाईकांनी फिर्यादी यांना माहेरुन २ लाख रुपये घेऊन ये, असे बोलून मारहाण केली. पतीने फिर्यादीचे सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक केले. स्वत: मुलासोबत चॅटिंग केले. त्यावरुन फिर्यादीला तुझे बाहेर संबंध आहेत. तू मला घटस्फोट दे अशी धमकी दिली. तसंच फिर्यादीचा मानसिक व शारीरीक छळ केला.