बहुजननामा ऑनलाइन टीम – लासलगाव – भूतलावर जगदंबेची 51 शक्तिपीठांपैकी(Hundreds of years old) एक असलेल्या व श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती चे रूप असलेल्या चास नळी येथील जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव शेकडो वर्षांनंतर(Hundreds of years old) प्रथमच रद्द करण्याची वेळ आलेली आहे शिवाय या नऊ दिवसात शेकडो भाविक घटी बसतात मात्र ही परंपरा खंडित होणार आहेत
कोपरगांव तालुक्यातील चास नळी गावचे ग्रामदैवत माता जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सव काळात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात सर्व भाविकांच्या नवसाला पावणारी व निशश्रकाला शक्ती देणारी ही माता असल्याने सर्व जण मातेच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात हे देवस्थान जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठान असल्याने नवरात्रोत्सव काळात शेकडो महिला पहाटे दुर्गा सप्तशती पारायण करतात व घरातील प्रत्येक जण नऊ दिवस घटी बसतात व भजन कीर्तनाचा कार्यक्रम असतो तसेच अबाल वृध्दा़पासुन ते गरीबांपासुन श्रीमंता पर्यंत सर्व धर्मीय मनोभावे प्रार्थना करतात व आशिर्वाद घेतात मात्र यंदा कोरोनाचा कहर सुरूच असल्याने शासनाच्या आदेशानुसार आजच्या पोलीस प्रशासनाने
ग्रामस्थांची बैठक घेऊन नवरात्रोत्सव रद्द करण्याचा एक मुखाने निर्णय झाला असून या काळात नऊ दिवसात देवी मंदिरात सकाळ व संध्याकाळी मंदिर पुजारी व पाच ग्रामस्थांच्या उपस्थिती
मध्ये देवीची पूजा अर्चा शासनाच्या आदेशानुसार सोशल डिश्टन्सचे पालन ठेवून करण्यात येणार आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अद्याप मंदिरे सुरु करण्यास परवानगी दिली नसल्याने येथे नवरात्रोत्सव काळात नियोजन संदर्भात बैठक पार पडली या वेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कोपरगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके ,पोलीस पाटील, प्रकाश शिंदे, गणपतराव चांदगुडे, विकास चांदगुडे, सुभाष गाडे, ह.भ. प. श्री. बाबुराव महाराज चांदगुडे, संजय चांदगुडे, ज्ञानेश्वर शिंदे, मनोज गाडे, मच्छिंद्र शिंदे, नानासाहेब बनसोडे, शिवदत्त गाडे ,दिलीप चांदगुडे, प्रभाकर आहेर, बाळासाहेब शिंदे आदि उपस्थित होते.