बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातच नव्हे तर एकूणच भारतातील विवेकवादि चळवळीचा चेहरा ठरलेले आणि जादुटोना विरोधी कायदा व जात पंचायत निर्मूलन कायदा निर्मितीचे खरे मार्गदर्शक विवेकसुर्य व अंनिस महाराष्ट्रचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभोलकर. . .
20 ऑगस्ट 2019 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा यांच्या हत्तेला सहा वर्ष पूर्ण होत असताना, महाराष्ट्र अंनिस ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ हे अभियान 20 ऑगस्ट 1 नोव्हेंबर दरम्यान चालवीत आहे. या अनुषंगाने महा अंनिस शाखा कोल्हापूर, मंगळवार दिनांक 20 आॕगस्ट रोजी सकाळी सात वाजता डाॕ. दाभोलकर , पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश याना अभिवादना साठी बिंदूचौकात एकत्रीत येत आहोत.
महापुराच्या भयंकर परिस्थीतीत माॕर्निंग वॉक घेणं योग्य ठरणार नाही तेव्हा आपण सगळे अभिवादना साठी आणि सर्वानी पुरग्रस्ता केलेल्या मदतीचा आढावा घेण्यासाठी आणि इथून पुढे काय कराव याची रुप रेषाही ठरविली जाइल. तेथे साफ सफाई ही केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी ‘आईन्स्टाईन’ हे नाटक आयोजित करत आहे. सदर नाटक गेब्रियल इमॅन्युअल यांनी लिहिले असून डॉक्टर शरद नावरे यांनी त्याचा अनुवाद केला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर शरद भुताडिया हे नाटक सादर करतील. या नाटकात आईन्स्टाईन या जागतिक कीर्तीच्या महान शास्त्रज्ञाने सत्तराव्या वाढदिवसादिवशी नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर आपल्या आयुष्याचा घेतलेला परामर्श थेट प्रेक्षकांशी संवाद रुपात सादर होतो. सन 2018 पासून 20 ऑगस्ट हा दिवस वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून ‘विज्ञान-विवेक-मानवता’ यांचीसांगड घालणारे हे नाटक आम्ही आयोजित करत आहोत.
नाटक – आईन्स्टाईन
सादरकर्ते- जेष्ठ रंगकर्मी
नाट्य आणि चित्रपट आभिनेते शरद भुताडीया
बुधवार दिनांक 21 आॕगस्ट
वेळ सायंकाळी 6 वाजता
नाटकाचे स्थळ – शाहू स्मारक भवन , दसरा चौक, कोल्हापूर