मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – HSC Exam Paper Leak Case | टीईटी (TET Exam Scam), म्हाडा (Mhada Paper Leak Case), आर्मी (Army Paper Leak Case Pune) अशा परीक्षांचे पेपरफुटी प्रकरण गाजत असतानाच आता बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर (Chemistry Exam Paper) फुटला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी (Vile Parle Police) कारवाई करुन एका खासगी क्लास चालविणार्या शिक्षकाला अटक केली आहे. (HSC Exam Paper Leak Case)
A tuition teacher, Mukesh Singh Yadav arrested by Vile Parle Police in connection with Class 12th Chemistry Question Paper leak. Probe reveals that he ran pvt coaching classes in Malad & leaked the question paper on a WhatsApp group before exams: Mumbai Police#Maharashtra
— ANI (@ANI) March 14, 2022
मुकेश सिंह यादव (Mukesh Singh Yadav) असे या खासगी क्लास चालविणार्या शिक्षकाचे नाव आहे. बारावी परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर शनिवारी होता. मुकेश सिंह यादव याने परीक्षेपूर्वी आपल्या क्लासमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हॉटसअॅपवर (Exam Paper On WhatsApp) हा पेपर पाठविला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (HSC Exam Paper Leak Case)
ही माहिती मिळताच विले पार्ले पोलिसांनी त्यातील ३ विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. त्यांना हा पेपर मुकेश सिंह यादव याच्याकडून मिळाल्याचे समजताच पोलिसांनी मुकेश सिंह यादव याला अटक केली आहे. त्याला हा पेपर कोणी दिला. त्यासाठी त्याने किती पैसे दिले. आणखी किती जणांना पेपर पुरविला, याचा तपास करण्यात येत आहे.
Web Title :- HSC Paper Leak Case | After TET Mhada Army paper leak case chemistry paper of class xii leaked in mumbai vile parle police arrested private class teacher
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PAN-Aadhaar Link पासून ITR फायलिंग पर्यंत… या महिन्यात ‘ही’ 5 कामे करणे आवश्यक