बहुजननामा ऑनलाईन- दिवसेंदिवस आधार कार्डचे महत्व वाढत आहे. कोणत्याही सरकारी कामांसाठी आधारकार्ड मागविले जाते. त्यामुळे त्यात अचुक माहिती असणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच वेळा आधारात अनावधानाने चुका होतात. आता तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय चुका दुरुस्त करु शकता आणि नवीन माहितीही अपडेट करु शकता. यात नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, फोटो, फिंगर प्रिंट आणि डोळ्यांच्या स्कॅनिंगचा समावेश आहे.
आपण आधार सेवा केंद्रावर ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता
आधारात पत्त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती आद्ययावत करण्यासाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागते. तर नवीन आधार कार्ड बनवायचे असल्यास किंवा तपशील अद्ययावत करायचा असेल तर ऑनलाइन अपॉईंटमेंट घेता येईल. पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर यूआयडीएआयद्वारे संचालित आधार सेवा केंद्रांवर (एएसके) ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. यूआयडीएआयने ट्वीटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
आधारमधील माहिती ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आवश्यक माहिती
आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आपल्याकडे आधार क्रमांकाशी नोंदणीकृत केलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. कारण अपडेट प्रक्रियेदरम्यान ओटीपी क्रमांक त्या मोबाईल क्रमांकावर पाठविला जाईल. आपल्याकडे तो मोबाईल नंबर नसल्यास, नंतर आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तो अद्ययावत करावा लागेल. त्यानंतरच आपण आपले आधार कार्ड ऑनलाइन आद्ययान्वित करू शकाल.
जन्मतारीख एकदाच अपडेट होऊ शकते
आधारमध्ये जन्माची तारीख आणि लिंग याबाबची माहिती फक्त एकदाच अपडेट होऊ शकते. जन्मतारीख अद्ययावत करण्यासाठी वैध कागदपत्रांसह तुम्हाला त्यासंबंधीचा पुरावा आधार केंद्रात सादर करावा लागेल.