नवी दिल्ली : वृत्त संस्था – स्मार्टफोन आज आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोन चोरी होणे किंवा हरवण्याच्या घटना नेहमी घडत असतात. अशावेळी त्यामधील डेटा धोक्यात असतो. फोन चुकीच्या हातात गेल्यास डेटाचा चुकीचा वापर होऊ शकतो. अशा स्थितीत गुगल आपल्या अँड्रॉईड यूजर्सला फोन शोधणे आणि डेटा डिलिट करण्याची सुविधा देते. याबातची पद्धत जाणून घेवूयात…
असा शोधण्याचा प्रयत्न करा
स्टेप 1: Find My Device वेबसाइटवर जा, ही वेबसाइट गुगल सर्च केल्यानंतर सापडेल.
स्टेप 2: येथे आपल्या त्याच गुगल अकाऊंटने लॉगिन करा जे स्मार्टफोनमध्ये सुरू असेल.
स्टेप 3: लॉगिन होताच वेबसाइट तुमचा फोन शोधण्यास सुरूवात करेल.
स्टेप 4: वेबसाइट गुगल मॅपवर फोनचे शेवटचे लोकेशन दाखवले.
स्टेप 5: यासाठी तुम्ही मॅपवर लोकेशनचे डायरेक्शन सुद्धा पाहू शकता आणि फोनपर्यंत पोहचू शकता.
जर तुम्ही Find My Device फिचरद्वारे फोन शोधू शकला नाहीत तर हे योग्य ठरते की फोनचा संपूर्ण डेटा डिलिट करा
स्टेप 1: यासाठी सुद्धा तुम्हाला Find My Device वेबसाइटवर जावे लागेल.
स्टेप 2: येथे तुम्हाला Erase Device चा ऑपशन दिसेल.
स्टेप 3: या ऑपशनवर क्लिक करून Confirm करा.
स्टेप 4: आपले गुगल अकाऊंट व्हेरिफाय करा.
स्टेप 5: थोड्याच वेळात फोन रिसेट होऊ लागेल आणि फोनचा डेटा सुद्धा डिलिट होईल.
स्टेप 6: लक्षात ठेवा ही पद्धत तेव्हाच अवलंबा जेव्हा तुम्हाला खात्री होईल की फोन आता परत मिळू शकत नाही.