बहुजननामा ऑनलाईन – मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कुंकू विक्रीला असते. ज्यामध्ये लाल, ऑरेंज किंवा मरून कुंकू असते. मार्केटमध्ये सध्या केमिकल युक्त कुंकू सुद्धा असते. जे कपाळ किंवा भांगात लावल्यास त्रास होऊ शकतो. यामुळे केस गळू शकतात किंवा इतर त्रास होऊ शकतो. या समस्येपासून बचाव करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी नॅचरल कुंकू तयार करू शकता. जाणून घेवूयात पद्धत…
साहित्य
– हळद – 1 चमचा
– चूना – अर्धा चमचा
– गुलाबजल – आवश्यकतेनुसार
– गुलाबाच्या पाकळ्या – 15
कुंकू बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम एका वाटीत 1 चमचा हळद, हळदीच्या एक चतुर्थांश चूना, आवश्यकतेनुसार गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका. या सर्व वस्तू चांगल्या प्रकारे मिसळा. हे सर्व मिक्स केल्यानंतर लाल रंग येईल. लक्षात ठेवा पेस्ट सुखल्यानंतर हे ऑरेंज कलरचे होईल. पेस्ट नरम करण्यासाठी गुलाबजलचा वापर करावा लागेल. हे कुंकू लावल्याने कोणतंही नुकसान होणार नाही.