नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वी ‘पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. आता मात्र भारतामध्ये पासपोर्ट अर्ज करण्यासाठी अधिक सोपा मार्ग आला आहे. पासपोर्ट सेवा पोर्टलवरुन यासाठी अर्ज करता येणार आहे. नियुक्तीसाठी वेळ घेतल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळणीसाठी जावं लागेल. याबाबत काही सोप्या आणि सरळ मार्ग धरून ऑनलाईन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.
हा अतिशय सोपा मार्ग अवलंबल्यामुळे पासपोर्टसाठी मूळ कागदपत्रे असावे लागतील. हे कागदपत्रे पासपोर्ट ऑफिसमध्ये तपासले जातात. तसेच, पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ९० दिवसांच्या आत पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागणार आहे. यामध्ये आणखी एक नमूद केले आहे की, ऑफिसमध्ये जाण्यासाठी कोरोनाचे नियम बघून करणे आवश्यक आहे. तर सोपा आणि सरळ मार्ग कोणता आहे ते बघा.
कशी कराल प्रक्रिया?
– प्रथम अगोदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पासपोर्ट सेवा पोर्टलवर जावं लागणार आहे.
– यानंतर रजिस्टर नाऊवर लिंकवर क्लिक करणे.
– यामध्ये संपूर्ण डिटेल्स भरावे लागणार आहे.
– त्यामध्ये तुमच्या जवळचं पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करू शकता,
– त्यानंतर तिथे वेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे.
– डिटेल्स भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा.
– त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा.
– नंतर पासपोर्ट सेवा पोर्टलवर आपल्या रजिस्टर्ड आयडीने लॉगईन करा.
– हे झाल्यावर Apply for Fresh Passport/ Re-issue of passport लिंकवर क्लिक करा.
दरम्यान, या प्रक्रियेमुळे फ्रेश पासपोर्टवर अप्लाय करून जर तुमच्याकडे पूर्वी कोणताही पासपोर्ट नसेल. जर पासपोर्ट अगोदरच असेल, तर Re-issue कॅटेगरीमध्ये जावे लागेल. येथे सर्व आवश्यक माहिती भरा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करणे. येथे पे अँड शेड्युल युअर अपॉईंटमेंटवर क्लिक करुन पे (शुल्क) करावं लागेल. त्यानंतर अपॉईंटमेंट शेड्युल करता येणार आहे. तसेच, यानंतर एक मेसेज मिळेल किंवा या फॉर्मची प्रिंटही मिळणार आहे. त्यानंतर Application receipt आणि ओरिजनल डॉक्युमेंट्ससह पासपोर्ट ऑफिसला जावं लागेल. येथे वेरिफिकेशन झाल्यानंतर काही कालावधीतच पोस्टाने तुमच्या घरी पासपोर्ट येणार आहे.