बहुजननामा ऑनलाईन – आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर lpg cylinder ही एक महत्वाची भूमिका बजावत असतो. सिलिंडरमध्ये lpg cylinder किती गॅस शिल्लक आहे? यावरून लोक नेहमी संभ्रमित राहतात.
अचानक सिलिंडरमधील गॅस संपल्याने त्रासही सहन करावा लागतो.
परंतु, घरच्या घरी सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकता.
यासाठी घरच्या घरी करता येणारी खूप सोपी पध्दत आहे. जाणून घ्या.
आपल्या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे तपासण्यासाठी प्रथम एक कापड पाण्यात भिजवून ओले करून घ्यावा.
आता या ओल्या कपड्याने सिलिंडरवर एक जाड रेषा काढा.
यानंतर 10 मिनिटे वाट पाहा. आता आपल्या सिलिंडरचा जो भाग रिकामा असेल, तो भाग लवकर कोरडा होईल आणि जिथे गॅस शिल्लक आहे त्या भागावरील पाणी उशीरा कोरडे होईल.
अशा प्रकारे आपण आपल्या सिलेंडरमध्ये गॅसचे प्रमाण किती आहे, हे सहजपणे शोधू शकता.
वास्तविक, सिलिंडरचा मोकळा भाग गरम असतो, म्हणून रिक्त भागातील पाणी लवकर कोरडे होते
आणि गॅसने भरलेला भाग त्यामानाने थंड असतो, त्यामुळे त्या भागातील पाणी उशीरा कोरडे होते.
ही पद्धत आपल्याला किती गॅस शिल्लक आहे, हे समजण्यासाठी मदत करू शकते.
कृपया हे देखील वाचा:
पायी वारीला परवानगी द्या, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल; याला सरकार जबाबदार असेल, वारकरी आक्रमक
कोरोना व्हायरस ‘बहिरं’ देखील बनवतोय; ‘जिभ’ अन् ‘नाका’नंतर आता कानांवर देखील दुष्परिणाम
पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त
14 जून रोजी फक्त 303 रुपये गुंतवा आणि करा चांगली ‘कमाई’
तुम्हाला सुद्धा बदलता येत नसेल ‘जीमेल’चा पासवर्ड तर जाणून घ्या पूर्ण प्रोसेस