बहुजननामा ऑनलाइन टीम – मार्च 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षात तालिबानकडे(Taliban ) 1.6 अरब डॉलर पोहचले. ही रक्कम तालिबानसाठी किती मोठी आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, अफगाणिस्तान सरकारकडे याच कालावधीमध्ये 5.55 अरब डॉलर पोहचले. तालिबानकडे आलेल्या इतक्या पैशांचा खुलासा स्वत: तालिबानचा मृत कथित आध्यात्मिक नेता मुल्ला मोहम्मद उमरचा मुलगा मुल्ला याकूबने एका गोपनीय रिपोर्टमध्ये केला, जो नाटोने कमीशन केला आणि नंतर रेडियो फ्री यूरोपने जारी केला.
अफगाणिस्तानमध्ये विद्रोही संघटना तालिबानला जेव्हापासून अमेरिकेने 2001 पासून ठेचायला सुरूवात केली, त्यानंतर तालिबानचे दशहतवादी कशाप्रकारे आणखी-आणखी श्रीमंत आणि शक्तीमान होत गेले, याबाबत खुलासा करताना अफगाणिस्तान स्टडीजवर विश्लेषक म्हणून कन्व्हर्सेशनसाठी हनीफ सूफीजादा यांनी जो लेख लिहिला, त्यानुसार जाणून घेवूयात की, तालिबानकडे इतका पैसा कुठून येत आहे.
ड्रग्ज :
संयुक्त राष्ट्राच्या 2020 च्या रिपोर्टनुसार, जगात मागील 5 वर्षात अफीमचे जेवढे उत्पादन झाले, त्यापैकी सुमारे 84 टक्के अफगाणिस्तानच्या भागातील आहे. याचा अर्थ हा आहे की, अफीम उत्पादनाच्या मोठ्या भागावर तालिबानचे नियंत्रण आहे. इतकेच नव्हे, तालिबान या नेटवर्कमध्ये 10 टक्केच्या हिशेबाने प्रत्येक उत्पादनावर टॅक्स वसूल करते. अफीमच्या अवैध उद्योगातून तालिबानकडे सुमारे 41.6 कोटी डॉलरपर्यंतची मोठी रक्कम पोहचत आहे.
मायनिंग :
अफगाणिस्तानमध्ये लोह खनिज, संगमरवर, तांबे, सोने, झिंक आणि अन्य किमती खनिजे आणि धातूंच्या उत्खननाचा मोठा उद्योग आहे, ज्यातील मोठा भाग तालिबानला फायदा पोहचवतो. आपला उद्योग करण्यासाठी लहान-मोठे सर्व उद्योजक तालिबानला प्रोटेक्शन मनी देतात. हा पैसा न देणे म्हणजे मृत्यू असतो. स्वत: तालिबानच्या कमीशननुसार, यातून त्यांना 40 कोटी डॉलरपर्यंत कमाई होते, तर नाटोच्या हिशेबाने हा आकडा 46.4 कोटी डॉलरपर्यंत होऊ शकतो.
वसूली आणि टॅक्स :
होय, तालिबान एक प्रकारचे पॅरलल सरकार चालवत आहे. टॅक्सच्या नावाने जबरदस्तीने वसूली केली जाते आणि रितसर याची रिसिटसुद्धा दिली जाते. मायनिंग उद्योगच नव्हे, तर मीडिया, दूरसंचार, डेव्हलपमेंट प्रोजेक्टपासून अंतरराष्ट्रीय संस्थांपर्यंत तालिबान जबरदस्तीने वसूली करते. याशिवाय इस्लामी प्रणालीने ‘उश्र’ आणि ‘जकात’च्या हिशेबाने पिकावर सुद्धा तालिबान 10 टक्केपेक्षा जास्त टॅक्स वसूल करते. यातून तालिबानला वर्षभरात सुमारे 16 कोटी डॉलरची रक्कम मिळते.
चॅरिटीतून 24 कोटी :
मुख्यत्वे पर्शियनच्या खाडीत असे काही सोर्स आहेत, जेथून तालिबानला गुप्त प्रकारे चॅरिटी मिळते. लेखानुसार, या डोनेशनमधून सुमारे 20 कोटी डॉलरपर्यंत तालिबानच्या हातात येतात. यास अमेरिकन दहशतवादी फंडिंग समूह म्हणतात. यांच्याशिवाय, अरब, पाकिस्तान, इराण आणि अन्य पर्शियन देशातून प्रायव्हेट डोनेशन म्हणून तालिबानला 4 ते 6 कोटी डॉलरपर्यंत पैसा मिळतो.
एक्सपोर्टचा धंदा :
तालिबान इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या धंद्यात गुंतलेली आहे. नूरजाई ब्रदर्स लिमिटेड सारख्या कंपन्यांद्वारे तालिबान आटो पार्ट इम्पोर्ट करते आणि रीअसेंबल केलेली वाहने आणि स्पेयर पार्ट एक्सपोर्ट करते. याशिवाय ड्रग्ज आणि मायनिंगच्या उत्पादनांचे एक्सपोर्ट सुद्धा तालिबानचा धंदा आहे. यातून तालिबान 24 कोटी डॉलर जमवते.
अन्य सोर्स :
अफगाणिस्तानसह पाकिस्तान आणि काही अन्य देशांत तालिबानची प्रॉपर्टी आहे. मुल्ला याकूब याच्यानुसार, रियल एस्टेटमधून वर्षात तालिबानला सुमारे 8 कोटी डॉलरपर्यंचा नफा होतो. तर, दूसर्या देशांतून होणार्या फंडिंगमधून तालिबानकडे सुमारे 11 कोटी डॉलर वार्षिक पोहचतात. मात्र, जाणकार मानतात की, हा फंड 50 कोटी डॉलर वार्षिक सुद्धा असेल तरी, हैराण करणारी बाब नाही.